मुंबई

२० टक्क्यांनी वाढले रुग्ण, वैयक्तिक स्वच्छता पाळण्याचे आावाहन

CD

गॅस्‍ट्रोच्या रुग्‍ण संख्येत वाढ
बाहेरच्या अन्नपदार्थांमुळे पोटदुखी; स्वच्छता पाळण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : अर्ध्याहून अधिक आजारांचे मूळ कारण पोट आहे. पोटाची काळजी घ्या, चांगले, स्वच्छ अन्न आणि पाणी प्या, असा सल्ला डॉक्टर नेहमीच देतात, पण मुंबईकर याकडे लक्ष देत नसल्‍याचे दिसून आले आहे. कोविड दरम्यान कमी झालेल्या गॅस्ट्रोग्रस्त रुग्णांचा आलेख या वर्षी झपाट्याने वाढत आहे. या वर्षाच्या पहिल्या ५ महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बाहेरच्या खाद्यपदार्थांमुळे नागरिकांच्या पोटात बिघाड होत असून गॅस्ट्रोचा आलेख वाढत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये मुंबईत २५४९ लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. २०२१ मध्ये आलेख आणखी वाढला, एका वर्षात ३११० रुग्ण नोंदले गेले. २०२२ मध्ये लॉकडाऊन पूर्णपणे उठल्यानंतर ५५३९ पर्यंत वाढ झाली. मात्र या वर्षी जानेवारी ते ११ जूनपर्यंत गॅस्ट्रोने ग्रस्त असलेल्यांची संख्या ६६७७ वर पोहोचली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या ५ महिन्यांत रुग्णसंख्येत २०.५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या वेळी बाहेरील कॅटरिंग जवळपास बंदच होते. मात्र, लॉकडाऊननंतर पुन्हा कार्यालये आणि बाहेरचे खानपान सुरू झाले, त्यामुळे पुन्हा केसेस वाढू लागल्या आहेत.

ओपीडीमध्ये गॅस्ट्रोचे बरेच रुग्ण आढळतात; मात्र केवळ १० ते १५ टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करावे लागते. विशेषत: जेव्हा अतिसार आणि उलट्यांमुळे शरीराचे निर्जलीकरण होते. पावसाळ्यात रुग्‍णसंख्या आणखी वाढू शकते. त्यामुळे लोकांनी फक्त उकळलेले पाणी प्यावे आणि स्वत:च्या स्वच्छतेवर भर द्यावा.
- डॉ. संजय चंदनानी, सहायक प्राध्यापक, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग, नायर रुग्णालय

गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे दूषित अन्नाचे सेवन आणि दुसरे म्हणजे पालिकेने अहवाल प्रणालीत काही बदल केले आहेत. ज्यामुळे आता पूर्वीपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली जात आहेत. लोकांनी काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. वैयक्तिक स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. उकळलेले पाणी प्या.
- डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

कोविड कालावधीच्या तुलनेत गॅस्ट्रोच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता कोणतेही बंधन नाही, लोक बाहेर जाऊन रस्त्यावरचे पदार्थ खातात. उन्हाळा आणि पावसाळ्यात अन्न लवकर खराब होते, ज्यामुळे गॅस्ट्रो होतो. पाण्याच्या लाईनमध्ये गळती होऊन पाणी दूषित येते. गेल्या महिनाभरात गॅस्ट्रोचे जवळपास ४०० रुग्ण तपासले, पण त्यात केवळ १० ते १५ टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. बरे होण्यासाठी किमान २ ते ३ दिवस लागतात.
- डॉ. नीरज तुलारा, संसर्गजन्य रोग विशेषज्ञ, एल. एच. हिरानंदानी रुग्णालय
....................................
लक्षणे
मळमळ आणि उलट्या
अतिसार
ओटीपोटात पेटके आणि वेदना
पहिले दोन दिवस ताप
....................................
काय करावे?
वैयक्तिक स्वच्छता
चांगले शिजवलेले अन्नाचे सेवन
उकळलेले पाणी प्या
खाद्यपदार्थ झाकून ठेवा
बाहेरचे खाणे टाळा

काय करू नये
स्वतः औषधोपचार टाळा
बाहेरचे फास्ट फूड आणि जंक फूड टाळा
कापलेली फळे आणि बर्फ असलेल्या रसाचे सेवन करू नका.
शिळे अन्न खाऊ नका

गेल्या काही वर्षांची आकडेवारी
वर्ष रुग्ण
२०२० २५४९
२०२१ ३११०
२०२२ ५५३९
२०२३ (जून) ६६७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

SCROLL FOR NEXT