मुंबई

समाज मंदिराच्या जागेवरील बांधकाम परवानगी रद्द

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : गेल्या काही महिन्यांपासून वर्तकनगर समाज मंदिर सभागृहाच्या भूखंडावरून सुरू असलेल्या लढ्याला अखेर संघर्ष समितीला यश आले आहे. विहंग महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेला बांधकामासाठी दिलेली निविदा रद्द करण्यात आली असून म्हाडाने सकारात्मक विचार केला असल्याचे समाज मंदीर संघर्ष समिती तर्फे मनसेचे संदीप पाचंगे यांनी सांगितले.
वर्तकनगरवासीयांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘वर्तकनगर समाजमंदिर सभागृहा’चा भूखंड लाटण्याचा प्रयत्न काही खासगी संस्थेने आखला होता. याविरोधात वर्तकनगरवासियांनी आवाज उठविला आणि याला वर्तकनगर समाजमंदिर संघर्ष समितीच्या मनसे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या सर्वपक्षीय सदस्य व स्थानिकांनी विरोध केला. याप्रश्नी पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. आमदार संजय केळकर यांनीही विधानसभेत हा मुद्दा मांडला होता. अखेर संघर्ष समितीच्या एकत्रित लढ्याला यश आले असून विहंग महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेला २०२० साली दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान आमदार संजय केळकर यांनी म्हाडा मुख्याधिकारी व समाज मंदिर संघर्ष समिती अशी संयुक्त भेट घडविली होती. या जागेवर निवासी व वाणिज्य इमारत न उभारता फक्त समाज मंदीर सभागृह, वाहन तळ, क्लब हाऊस व्हावे अशी मागणी केली होती. या लढ्याला आलेल्या यशाबद्दल समितीने सोमवारी भेट घेत आभार व्यक्त केले.
................
११ ऑगस्टला बोली
ठाण्यातील समाजमंदिर भूखंड ९० वर्षांच्या जमीन भाडेपट्टा करारावर दर ३० वर्षांनी भाडेपट्टा नूतनीकरण करार आणि वार्षिक १० कार्यक्रम मोफत देण्याच्या अटीवर ई-लिलाव काढला आहे. या ई-लिलाव प्रकियेत तीन संस्थानी भाग घेतला असून ११ ऑगस्ट रोजी लिलाव जाहीर होईल. त्यात सर्वात जास्त बोली देणाऱ्या संस्थेस समाजमंदिर भूखंड देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT