मुंबई

निर्देशांकांची आगेकूच सुरू

CD

मुंबई, ता. ३१ : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज अनुकूल जागतिक वातावरणाचा फायदा घेत भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी अर्धा टक्का वाढ दर्शवित आपली आगेकूच पुन्हा सुरू केली. आज सेन्सेक्स ३६७.४७ अंश, तर निफ्टी १०७.७५ अंशांनी वाढला.

अमेरिकी कंपन्यांचे उत्पन्न वाढले, तर चीनच्या औद्योगिक उत्पादनाचा तपशील अपेक्षेपेक्षा चांगला आल्यामुळे आज जागतिक शेअर बाजारांमध्ये उत्साह होता. त्यातच भारतीय कंपन्यांच्या चांगल्या निकालामुळेही त्यात भर पडली. त्यामुळे सकाळपासूनच निर्देशांक नफा दाखवित होते व नंतर त्यात भर पडली. दिवसअखेर सेन्सेक्स ६६ हजार ५२७.६७ अंशावर, तर निफ्टी १९,७५३.८० अंशावर स्थिरावला.

साऱ्या जगात चलनवाढीचा दर घटत असल्याने आता आर्थिक निर्बंधही फारसे लावले जाणार नाहीत, या आशेवर आज सर्व शेअर बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. युरोपची चलनवाढ देखील अपेक्षेनुसार ५.३ टक्क्‍यांपर्यंत मर्यादित राहिली; तर जूनमध्ये त्यांची अर्थव्यवस्थाही चांगल्यापैकी वाढली. भारतात आज एनटीपीसीने चांगले निकाल दिल्यामुळे तो शेअरही चार टक्क्यांपर्यंत वाढलाच, पण ऊर्जा क्षेत्राच्या इतर शेअरकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले.

आज बीएसईवर टाटा स्टील, टीसीएस, टेक महिंद्रा दोन टक्के वाढले. मारुती, टाटा मोटर, विप्रो, जे.एस.डब्ल्यू स्टील हे शेअर दीड टक्का वाढले. बजाज फिन्सर्व, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्र, इंडसइंड बँक, इन्फोसिस, टाटा मोटर हे शेअरही एक ते दीड टक्का वाढले; तर बजाज फायनान्स, हिंदुस्तान लिव्हर, कोटक बँक या शेअरचे भाव एक टक्क्यांच्या आसपास घसरले.

...
भारतीय कंपन्यांनी या तिमाहीत चांगले निकाल नोंदवल्यामुळे सलग चौथ्या महिन्यात भारतीय शेअर बाजारांनी वाढ दाखवली. जुलै महिन्यात आतापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १४ हजार ६०० कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहेत, तर पाऊसही समाधानकारक होत आहे. या सर्व कारणांमुळे सध्या बाजार तेजीत आहे. तो यापुढेही असाच थांबत आणखी नफा दाखवेल.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT