vashi sakal
मुंबई

Vashi : आता वाशी होणार वाहतूक कोंडीमुक्त; महत्वाच्या प्रकल्पाचे काम होणार पूर्ण

सकाळ डिजिटल टीम

वाशी-कोपरखैरणे या मुख्य रस्त्यावर एकही पादचारी पूल नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पादचारी पूल बांधण्याचे काम चालू आहे.

वाशी, सेक्टर ९ येथील या पहिल्या पादचारी पुलाच्या कामातील काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर हे काम गतीने चालू आहे. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हे काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.


सिडकोने नवी मुंबईची निर्मिती करताना वाशी नोडपासून प्रारंभ केला. त्या वेळी पुढील काही वर्षांत वाढती लोकसंख्या, वाहने यांचा सिडकोने बांधलेला अंदाज काही प्रमाणात चुकीचा ठरल्याचे बोलले जात आहे. याचा प्रत्यय सध्या वाशी सेक्टर १ ते सेक्टर २८ पर्यंत गर्दीच्या वेळी सर्वांना येत आहे.

वाशी सेक्टर ९, १०, ११, १४, १५, १६ या विभागात पुष्कळ प्रमाणात झालेले व्यावसायीकरण आणि अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांनी केलेले बहुमजली बांधकाम, पुनर्विकासामुळे काही घरांची वाढलेली संख्या, विशेषतः सण उत्सव या काळात खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक वाशीतच अधिक प्रमाणात येणे, यामुळे सेक्टर ९ ते १४ हा परिसर बाराही महिने वाहने आणि पादचाऱ्यांमुळे गजबजून गेलेला असतो.

दोन कोटी ४४ लाख रुपये खर्चातून पादचारी पुलाचे बांधकाम होणार आहे. पुलाची लांबी २७ मीटर व रुंदी तीन मीटर इतकी आहे. या ठिकाणी दोन लिफ्टदेखील बसवण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना पूल चढ-उतार करण्यास मदत होणार आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT