NAVI MUMBAI  SAKAL
मुंबई

Navi Mumbai: सहजपणे होतेय गुटखा-तंबाखूची विक्री; नवी मुंबई बनतीये तस्करीचे केंद्र

सकाळ डिजिटल टीम

आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा, सुंगधी तंबाखूसारख्या पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच अनुषंगाने आठवड्याभरात ३२ ठिकाणांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील शहरात अगदी सहजपणे प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची विक्री होत असल्याने नवी मुंबई तस्करीचे प्रमुख केंद्र बनल्याचे दिसत आहे.

आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांमुळे विविध विकारांना अनेकजण बळी पडतात. त्यामुळे तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी, सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी राज्यात हातभट्टीची दारू, गुटखा, मावा आदीच्या विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आली आहेत.

मात्र, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्याचे काटेकोर पालन होत नसल्याने हा व्यवसाय चालत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. इतर राज्यात गुटखा उत्पादनास बंदी नसल्याने सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित तंबाखूची तस्करी केली जात आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनानेदेखील अशा विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. यात पनवेल शहरातील पान शॉपींबरोबर कोपरखैरणे, घणसोली, वाशी येथेही छापे मारून हजारो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांसमोर आव्हान
राज्यात तस्करी करून आलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखूच्या विक्रीतून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून गुटखा विक्रेते तसेच पुरवठादारांची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांना यात अपेक्षित यश मिळाले नसून अजूनही पान टपऱ्यांवर गुटख्याची खरेदी-विक्री सुरुच आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला गुटखा व अमली पदार्थ मुक्त करण्याचा नारा देणाऱ्या नवी मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना जुलैचा हफ्ता कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

AI Crime Uttar Pradesh : २५ लाखाचे कर्ज फेडण्यासाठी AI चा वापर करून १० वर्षीय मुलाचे अपहरण; १७ तास पोलिसांची दिशाभूल; सत्य समोर आलं ते धक्कादायक

JSOU Admission 2026 सुरू; घरबसल्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची मोठी संधी! नोकरी करतानाही मिळवा पदवी

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मुसळधार पावसाने १२ हजार हेक्टवरील संत्रा पिकाचे नुकसान

Sai Baba Donations: शिर्डीत भक्तांचा विक्रमी ओघ! तीन दिवसांत ७.८१ कोटींची देणगी, ११२ तोळे सोनेही अर्पण

SCROLL FOR NEXT