ajit pawar sakal
मुंबई

Ajit Pawar: कल्याणमध्ये धडाडणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची तोफ

CD

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी करण्यासह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कल्याण तालुक्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण विभागातर्फे येत्या रविवारी वरप येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे आणि पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसायला सुरुवात केली आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर आल्यानंतर कल्याण तालुक्यात अजित पवार पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रविवारी (ता. ७) कल्याण मुरबाड मार्गावरील वरप गावात हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. आगामी निवडणुकीची मोर्चे बांधणी आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार दौलत दरोडा, युवा नेते पार्थ पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला यांच्यासह रमेश हनुमंते, भरत गंगोत्री, सोनिया धामी, किसनराव तारमाळे, प्रवीण खरात आदी प्रदेश पदाधिकारी या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT