Accident esakal
मुंबई

Navi Mumbai: दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने डिलीव्हरी बॉयचा मृत्यू

CD

Navi Mumbai: जेवणाचे पार्सल पोहोचवून परतणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याची घटना एपीएमसी मार्केटमध्ये गुरुवारी मध्यरात्री घडली.

या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव सुबोधकुमार नारायण यादव (वय २५) असे असून तो मूळचा बिहार राज्यातला आहे. सध्या तो एपीएमसी सेक्टर-१९ मधील हॉटेल देवीप्रसाद बारमध्ये जेवणाचे पार्सल डिलिव्हरीचे काम करून त्याच ठिकाणी राहत होता. गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सुबोधकुमार हा वाशी परिसरातील जेवणाच्या पार्सलची ऑर्डर देऊन हॉटेलकडे परत निघाला होता. या वेळी दाणा मार्केट गेटसमोर सुबोधकुमार याचे भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले.

त्यामुळे तो रस्ता दुभाजकाला घासत जाऊन दुचाकीसह जोरात खाली कोसळला. यात तो गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातातील मृत सुबोधकुमारने भरधाव दुचाकी चालवल्याने या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने एपीएमसी पोलिसांनी मृत सुबोधकुमारविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT