Maghi Ganesh Utsav sakal
मुंबई

Maghi Ganesh Utsav: गणेश मूर्तींसाठी गुजरातहून मुंबई महानगरपालिकेने मागवली शाडूची माती!

सकाळ वृत्तसेवा

पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यासाठी यंदा शाडूची माती गुजरातहून महापालिकेने मागविली आहे. पर्यावरणास हानिकारक पीओपीच्या गणेशमूर्तींऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्ती साकारण्यासाठी मुंबई महापालिकेने गणेशमूर्तिकारांना शाडूच्या मातीचा मोफत पुरवठा केला आहे. यात ५०० टन शाडूची माती मूर्तिकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई महापालिकेने २२ लाख २४ हजार १३३ रुपये ५५ पैसे खर्च केले आहेत.

पीओपीच्या गणेशमूर्ती पर्यावरणास हानिकारक असून विसर्जनानंतर त्याचा परिणाम समुद्रातील जीवसृष्टीवर होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश राज्य सरकार व मुंबई महापालिकेला दिले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घरोघरी प्रतिष्ठापना केली जाणारी गणरायाची मूर्ती शाडूची असावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने गणेश मूर्तिकारांना केले.

यासाठी महापालिकेने मोफत शाडूची माती उपलब्ध केली. तसेच शाडूच्या मातीच्या मूर्ती साकारण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली. शाडूची माती उपलब्ध व्हावी, यासाठी पालिकेने निविदाही मागवल्या होत्या. यासाठी मुंबई महापालिकेने २२ लाख २४ हजार १३३ रुपये ५५ पैसे खर्च केले असून याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

अखेर गुजरात येथून शाडूची माती उपलब्ध झाली आणि ५०० टन शाडूची माती मुंबईत आणणण्यात आली. त्यानंतर शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांनी मोफत देण्यात आली. पालिकेच्या परिमंडळनिहाय मूर्तिकारांना माती वितरित करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,100 अंकांनी वाढला, निफ्टी 23,900 पार; सेन्सेक्स-निफ्टीत अचानक वाढ का?

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर दौऱ्यात मनोज जरांगेंकडून अंबाबाईचे दर्शन

SCROLL FOR NEXT