मुंबई

Railway: दादर स्थानकांत कॉंग्रेसतर्फे रेल रोको आंदोलन

Chinmay Jagtap

Railway: तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी युवक काँग्रेसकडून पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात मंगळवारी (ता. २३) रेल्वे रुळांवर उतरून रेल रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ लोकल खोळंबल्या होत्या. रेल्वे सुरक्षा दलाने तत्काळ आंदोलकांना बाजूला करून रेल्वे सेवा पूर्ववत केली. या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वे डाऊन मार्गावरील लोकल सेवांना फटका बसला.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बोरिवली लोकल दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर येत असताना दहा ते बारा आंदोलकांनी रुळांवर उतरत ती लोकल रोखून धरली. हे आंदोलन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले. रेल्वेरुळांवर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उतरल्याने पश्चिम रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती; मात्र सुरक्षा दलाच्या जवानांनी लागलीच पावले उचलून सेवा पूर्ववत केली. आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पुढील कारवाईसाठी दादर लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द केले.

घोटाळ्यामागील सूत्रधार शोध!
तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी करून घोटाळ्यामागील सूत्रधार शोधा, अशी प्रमुख मागणी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले. यापूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर आता युवक काँग्रेसच्या आक्रमक झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT