sambhaji nagar  sakal
मुंबई

Kalyan News: राममंदिराच्या लोकार्पणाचा विजय साजरा करत असताना दुचाकीवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा

Kalyan News: अयोध्या येथील राममंदिराच्या लोकार्पणाचा विजय साजरा करण्यासाठी शहरात काढलेल्या दुचाकी फेरीवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी (ता.२२) घडली.

दुर्गाडी किल्ल्याजवळील गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्यावरील पुलावर हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

राममंदिराच्या लोकार्पणचा विजय साजरा करण्यासाठी कल्याण शहरात दुचाकी फेरी काढण्यात आली. ही फेरी दुर्गाडी किल्‍ल्याजवळील गोविंदवाडी बाह्यवळण पुलाजवळून जात होती. यावेळी पुलाखालून अज्ञात व्यक्तीने फेरीच्या दिशेने दोन दगड भिरकावले.

यापैकी एक दगड एका दुचाकीच्या पुढे तर दुसरा मागे पडला. यात दुचाकीची क्रमांकाची पट्टी तुटली. पुलाखाली काही लोकांचा जमाव होता. त्यातील एका व्यक्तीकडे शस्त्र होते. त्या व्यक्तीला इतर व्यक्ती रोखून धरत होत्या, असे तक्रारदार दयाप्रभू शेंडकर, भावेश शिंदे, बबलू यादव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT