vitthal sugar factory fraud with bank file case letter to police 420 cr loan  esakal
मुंबई

Navi Mumbai Crime: पनवेलमध्ये व्यावसायिकाला ४४ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crime: पनवेलच्या पळस्पे येथील स्टील व्यावसायिकाकडे कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्याने वेगवेगळ्या भागातील ग्राहकांकडून जमा केलेली तब्बल ४४ लाख ५५ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पलायन केल्याची घटना उघड झाली आहे. आकाश श्रोती असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पनवेल शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.


पनवेलच्या पळस्पे भागातील स्टीलचे व्यावसायिक विनोद कुमार बन्सल (५८) यांचे विजय स्टील नावाचे गोदाम जुन्या मुंबई पुणे हायवेलगत पळस्पे येथे आहे. बन्सल यांच्याकडे १० कर्मचारी कामाला आहेत. त्यापैकी आकाश श्रोती हा गोदामातील माल लोड व अनलोडचे काम करत होता. तसेच अधूनमधून ग्राहकांकडून पैसे गोळा करण्याचे काम करत होता.

२२ जानेवारीला आकाश श्रोती याला कर्जत, कशेळी, रोहा, मुरबाड, नेरळ व रसायनी या भगातील स्टील खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून पैसे जमा करून आणण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यानुसार आकाशने विविध भागातील ग्राहकांकडून एकूण ४४ लाख ५५ हजार रुपये जमा केले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी तो न आल्याने बन्सन यांनी त्याला फोन लावला असता तो बंद होता. त्याचा पनवेल डेरवली येथील घरी शोध घेतला असता तेथेही तो सापडला नाही. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT