Rajan Vichare eknath shinde  sakal
मुंबई

Rajan Vichare: निष्ठावान शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या घरांवर नांगर फिरवला जातोय

सकाळ वृत्तसेवा

Rajan Vichare: Vs Eknath Shinde: आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्याचे दैवत होते. आज त्यांचे नाव घेत निष्ठावान शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात असून त्यांच्या घरांवर नांगर फिरवला जात आहे. त्यामुळे स्वत:ला सच्चे शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्यांना आता जनताच धडा शिकवेल, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केली.

शनिवारी (ता.२७) आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी जाऊन विचारे यांनी अभिवादन केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शिवसैनिकांनी दिवंगत आनंद दिघे यांच्या समाधीवर जाऊन अभिवादन केले. तसेच टेंभी नाका येथील दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ‘अमर रहे अमर रहे, दिघे साहेब अमर रहे’ या अशा घोषणाही त्यांनी दिल्या.

यावेळी ठाकरे गटाने टेंभी नाका आणि शक्तिस्थळावर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचाही प्रयत्न केला.

यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना विचारे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे खरे शिवसैनिक कोण हे आता आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. आगामी काळात दिघे हेच या गद्दारांना जागा दाखवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NASA: पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतंय 'ब्रह्मास्र'! विनाश वाचवण्यासाठी 'नासा' करतंय ३० हजार कोटींचा खर्च, इतिहासातली पहिलीच घटना

Heritage Tourism: जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान आणि करसवलतींचा लाभ, काय आहे योजना ?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय महामार्गाला ओढ्याचं स्वरुप, अभियंत्याचा मृत्यू

Ulhasnagar: महिला दिनाच्या ३ तासाच्या कार्यक्रमाला २२ लाख खर्च, ५० जणांना फेट्यासाठी ७५ हजार, तर नाश्ता अन् जेवणाचे १० लाख

तामिळनाडूत पक्षफुटीचे लोण! मुख्यमंत्री विजय यांचा AIDMKला धक्का, सहाव्या आमदाराचा राजीनामा; TVKमध्ये प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT