मुंबई

MNS News: इंग्रजी पाट्या फोडण्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड, 26 जण पोलिसांच्या ताब्यात

Mns News: न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर येथील दुकानांना मराठी पाट्या लावण्यासाठी २६ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार २५ जानेवारीला महापालिकेने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली.

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर येथील दुकानांवरील इंग्रजी पाट्यांविरोधात ठिय्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांनी ही कारवाई केली. काही वेळेनंतर सर्व कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर येथील दुकानांना मराठी पाट्या लावण्यासाठी २६ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार २५ जानेवारीला महापालिकेने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली.

अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवडे, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, दत्तात्रय जाधव, जेठानंद करमचंदानी, अनिल खतुरानी आणि बाजार व परवाना विभाग प्रमुख विनोद केणे यांनी कल्याण-बदलापूर महामार्गावर ३१ व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे ६२ हजारांचा दंड वसूल केला होता.

पण अजूनही दुकानदार मराठी पाट्या लावण्याबाबत उदासीन असल्याचा आरोप करत मनसेने आंदोलन सुरू केले होते. यासाठी बंडू देशमुख, संजय घुगे, प्रदीप गोडसे, मैनुद्दीन शेख, रवी पाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह २६ जणांना अटक करून सोडून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

IND vs ENG : अक्षर पटेल इतिहासाच्या उंबरठ्यावर! आज 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरणार?

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Latest Marathi Live Update: पुण्यात वाघोली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT