vashi market mumbai  sakal
मुंबई

Mumbai APMC News: बाजार समितीमध्ये मराठा आंदोलनामुळे वाढलेले भाज्यांचे दर पुन्हा पूर्वपदावर

CD

Vashi Market Mumbai: प्रजासत्ताक दिनाच्या सुटीनंतर मराठा आंदोलकांच्या लांबलेल्या मुक्कामामुळे वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. त्याचा परिणाम बाजारात भाजीपाला, तसेच धान्याच्या आवकवर झाला होता. राज्य तसेच परराज्यांतील माल वाहतूक दोन दिवस बंद असल्याने तुटवड्यामुळे भाज्यांच्या दरात किरकोळ वाढ झाली होती. त्यामुळे रविवारीही एपीएमसी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालाची वाहतूक झाल्याने भाज्यांचे दर पुन्हा पूर्वपदावर आले आहेत.

दोन दिवस बाजार बंद असल्याने निर्माण झालेल्या अन्नधान्य, तसेच भाज्यांची टंचाई भरून काढण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून रविवारच्या दिवशीही बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी, दोन दिवस पडून राहिलेल्या शेतीमालाची पुन्हा आवक सुरू झाल्याने व्यापारी, तसेच शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दोन दिवसांत भाज्यांची आवक वाढल्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. धान्य मार्केटमध्ये लहान, मोठ्या ४०० वाहनांमधून आवक झाल्यामुळे सुट्टीच्या दिवशीही बाजारात ग्राहकांची रेलचेल सुरू होती.

सोमवारी (ता. २९) बाजारात लहान, मोठी वाहने मिळून कांद्याने भरलेली एकूण ११६ वाहने बाजारात दाखल झाली. बटाट्याची ७० वाहने बाजारात दाखल झाली. तीन ट्रक भरून लसूण बाजारात आला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची आवक पूर्वपदावर आल्याने दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
-------------------------------------------------
मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन संपल्याची घोषणा झाली त्या वेळेपासून बाजार सुरू केला. त्यामुळे भाजी आणि धान्याची टंचाई जास्त प्रमाणात जाणवली नाही. रविवारीही बाजार सुरू असल्याने नवी मुंबई, तसेच मुंबईत कोणत्याही प्रकारची अन्नधान्य आणि भाज्यांची टंचाई जाणवणार नाही, याची पूर्ण दक्षता घेत आहोत. सर्व व्यापारी, मालवाहतूकदार, माथाडी कामगार, शेतकरी सहकार्य करत आहेत.
- संजय पिंगळे, अध्यक्ष, कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ, तुर्भे-वाशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT