Crime News sakal
मुंबई

Crime News: जबरदस्तीने टॅक्सीत घुसले अन् चाकूचा धाक दाखवत केली चालकाची लूट

Dombivli News: गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राम चोपडे, दत्तात्रेय गुंड, सहायक पोलिस निरीक्षक संपत फडोळ, प्रशांत आंधळे यांनी पथके तयार करत चोरट्यांचा शोध सुरू केला.

CD

Crime News: टॅक्सीचालकाला चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या तिघा सराईत चोरांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वाशीला जायचे आहे, असे सांगत जबरदस्ती टॅक्सीत बसून तिघांनी चालकास निर्जनस्थळी गाडी थांबविण्यास सांगून लुटले. ३० डिसेंबरला रात्री ही घटना घडली होती.

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी शफीक खान (वय २४), अमन तौकीर अहमद अन्सारी (वय २३) आणि आमन जामदार (वय २३) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मुंबईत राहणारे टॅक्सीचालक सचिन शाव (वय २०) हे ३० डिसेंबरला डोंबिवली येथे प्रवासी भाडे सोडण्यासाठी आले होते. भाडे सोडल्यानंतर ते पुन्हा मुंबईत जात असताना बदलापूर काटई रोडवर काटई नाका परिसरात तिघांनी हात दाखवून गाडीला थांबविले. त्यानंतर वाशी येथे जाण्याच्या बहाण्याने जबरदस्ती गाडीत ते बसले.

गाडी निर्जनस्थळावरून जात असताना चालकास चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्याच्याकडील टॅक्सी, मोबाईल फोन, रोख रक्कम, त्यांचे ओळखपत्र असा एकूण २ लाख २१ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. सचिन यांनी याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राम चोपडे, दत्तात्रेय गुंड, सहायक पोलिस निरीक्षक संपत फडोळ, प्रशांत आंधळे यांनी पथके तयार करत चोरट्यांचा शोध सुरू केला.

मिळालेल्या माहितीच्या आधारे खोणी पलावा फाटा, बदलापूर काटई रोड येथे पोलिसांनी सापळा रचत आरोपींना अटक केली. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेली टॅक्सी व वापरलेले हत्यार चाकू असा एकूण २ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक आरोपी आमन याच्यावर मानपाडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा तसेच अमन अन्सारी याच्यावर बी. के. सी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT