Crime News sakal
मुंबई

Crime News: ९५ लाखांच्या स्टील पाईपची चोरी करणाऱ्यांना अटक!

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai: कामोठे येथून ट्रेलरसह स्टेनलेस स्टीलचे पाईप असा तब्बल ९५ लाखांचा ऐवज चोरणाऱ्या दुकलीला पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेऊन अटक केली आहे. राजकुमार गौतम (४०) व अलोक सिंग अशी या दोघांची नावे असून त्यांनी चोरलेल्या ट्रेलरसह मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कामोठे येथील एका ट्रान्स्पोर्ट कंपनीत कामाला असलेला ट्रेलरचालक राजकुमार गौतम, क्लीनर अलोक सिंग यांच्यावर पनवेल येथून स्टेलनेस स्टीलचे ७५ लाखांचे पाईप कळंबोली येथील स्टील मार्केटमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी होती.

दोघांनी पनवेल येथून १४ चाकी ट्रेलरमध्ये पाईप घेतल्यानंतर रात्री कामोठे सेक्टर-२२ येथील जेएनपीटी रोडच्या सेवा रस्त्यावर पार्क केला होता. हीच संधी साधत आरोपींनी पहाटेच्या सुमारास पाईपसह ट्रेलर पळवून नेला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेलर नसल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रान्सपोर्ट मालकाने शोधाशोध सुरू केली. तसेच कामोठे पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार करण्यात आले होते.

या पथकाने नवी मुंबई हद्दीतील सर्व टोल नाके, तसेच सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून चोरीला गेलेल्या ट्रेलरचा शोध घेतला. यावेळी तळोजा परिसरात हा ट्रेलर उभा असल्याचे आढळून आले. मात्र, पाईप नसल्याने पोलिसांच्या पथकाने पाळत ठेवली होती. यावेळी आरोपी अलोक सिंग हा ट्रेलर घेण्यासाठी आला असताना पोलिसांनी त्याला पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT