Eknath Shinde group Uddhav Thackeray news esakal
मुंबई

Uddhav Thackeray: आयुष्यभर हुकूमशाही मार्गाने चाललेल्यांना लोकशाही कळली नाही

ganpat gayakvad and eknath shinde group on uddhav thackeray

CD

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने ‘तुमचे एक मत हुकूमशाही उलथवण्यासाठी’ असे मतदारांना आवाहन करणारे बॅनर डोंबिवली शहरात लावले आहेत. ठाकरे गटाच्या या बॅनरबाजीवर भाजप व शिवसेनेने त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.

हुकूमशाही नाही ही विकासशाही आहे, असे म्हणत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ठाकरे गटाला उत्तर दिले आहे. ही माणसे आयुष्यभर हुकूमशाही मार्गाने चालली. त्यांना लोकशाही कळली नाही, असे म्हणत शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ठाकरे गटाला टोला हाणला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सतर्क झाले आहे. विकासकामांचा धडाका, त्यासाठी निधीची तरतूद, कामांचे लोकार्पण, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार राजकीय पक्षांकडून सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून शिंदे गट व अजित पवार गटाकडूनही आपली ताकद दाखवून देण्यासाठी धडपड सुरू आहे.

त्यातच विधानसभेची गणिते पक्षांकडून आखली जात आहेत. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच, असा निकाल दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राज्याच्या राजकारणात सक्रिय झाला आहे.

त्यातही आतापर्यंत शांततेच्या भूमिकेत असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मतदारसंघाच्या दौऱ्यावर उतरल्याचे दिसत आहे. संपर्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी पहिलाच दौरा राज्यात केला. तोही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात.

यानंतर ठाकरे गटाकडून डोंबिवली शहरात बॅनरबाजी केली आहे. यातून मतदारांना त्यांनी आवाहन केले आहे. मतदार राजा ''हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरू नये... तुझं एक मत ‘हुकूमशाही’ उलथविण्यासाठी’ अशा आशयाचे बॅनर डोंबिवली शहरातील चौका-चौकांत लावले आहेत. ठाकरे गटाच्या या बॅनरबाजीवरून आता भाजप व शिवसेनेने त्यांना लक्ष करत त्यांच्यावर टीका केली आहे.

लोकांनी विकासासाठी मतदान केले आहे. देशाचा विकास होत आहे. इथे कोणतीही हुकूमशाही नाही. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आहे आणि त्या संविधानानुसारच सर्व कायद्याची कामे केली जात आहेत. त्यामुळे हुकूमशाहीचा प्रश्नच येत नाही. ही हुकूमशाही नाही तर विकासशाही आहे.
- गणपत गायकवाड, आमदार, भाजप

जी माणसे आयुष्यभर हुकूमशाहीच्या मार्गाने चालली ते काय लोकांना सांगणार की हुकूमशाही उलथवण्यासाठी मतदान करा. यांना आयुष्यभर लोकशाही कळली नाही. ते सांगतात की लोकशाही पद्धतीने मतदान करा. भाजप व शिवसेना हे पक्ष लोकशाहीच्या मार्गानेच चालत आहेत. म्हणून त्यांनी हे आम्हाला सांगू नये.
- राजेश मोरे, शहरप्रमुख, डोंबिवली शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT