crime news jail  sakal
मुंबई

Navi Mumbai: नायजेरीयन व्यक्ती करत होता अमली पदार्थांची विक्री; पोलिसांनी केली अटक

CD

खारघर सेक्टर-२७ मध्ये अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरियनला अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गिडेऑन इझे (२५) या नायजेरियन नागरिकाला अटक केली असून त्याच्याजवळ ५ लाख २० हजारांचे ५२ ग्रॅम वजनाचे एम. डी. सापडले आहे.

खारघर सेक्टर- २७ मधील पेठगाव परिसरात एक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने खारघर सेक्टर -२७ भागात सापळा लावला होता.

रात्री सव्वा नऊच्या सुमारास गिडेऑन इझे हा स्कुटीवरून संशयास्पदरीत्या या भागात आला होता. यावेळी अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याची धरपकड केली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५ लाख २० हजारांची तपकिरी रंगाची पावडर असलेला ५२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ आढळून आला आहे.

पोलिसांनी इझेकडे चौकशी केली, पण त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने एनडीपीएस कलमाखाली कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robert Kiyosaki Alert: शेअर मार्केट कोसळणार; रॉबर्ट कियोसाकींचा इशारा, वॉरेन बफेंनी बदलली भूमिका

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT