Kokan Railway News sakal
मुंबई

Railway News: आता कल्पवृक्षातून मध्यरेल्वे कमवणार महसूल; जाणून घ्या रेल्वेची भन्नाट कल्पना

सकाळ वृत्तसेवा

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा


Railway News: रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला अनेकदा उंच उंच नारळाची झाडे नजरेत पडतात. हीच झाडे आता रेल्वेच्या महसुलात मोठी भर घालणार आहेत.

मध्य रेल्वेने रेल्वे परिसरात असलेल्या नारळ आणि ताडाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज ही योजना आणली आहे. या योजनेमार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यातील एक भाग म्हणून मध्य रेल्वेने आपल्या जमिनीवर असलेल्या नारळविक्रीच्या झाडांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मध्य रेल्वेला वार्षिक लाखो रुपयांचा महसूल मिळणार आहे. तसेच नारळाच्या झाडांचे योग्यरीत्या देखभाल करता येणे शक्य होणार आहे.


सध्या मध्य रेल्वेच्या कारशेड, रेल्वे रुळाशेजारी आणि रेल्वेच्या मालकीतील अन्य रेल्वे जमिनीवर मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे आहेत. झाडावरून नारळ उतरविणे गरजेचे असते, कारण नारळ न उतरवल्याची झाडांची हानी होते. त्यामुळे मध्य रेल्वेने नारळविक्रीसाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या झाडांची मोजणी सुरू
१
सध्या रेल्वे हद्दीतील नारळाच्या झाड्यांची मोजणी सुरू आहे. मोजणी पूर्ण झाल्यावर निविदा मागविण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेत जो जास्त बोली लावेल. त्यांना कंत्राट देणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.


२ हिंदूंसह आशियातील अनेक धर्मांमध्ये नारळ हे फळ पवित्र मानले जाते. नारळचा वापर पूजा आणि आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या भागाचा उपयोग करता येतो. त्यामुळे नारळाचा झाड्याचे स्वरक्षण करण्यासाठी रेल्वेकडूनही योजना आखली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Trade: ... तर हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स संघात असता, पण दोन खेळाडूंमुळे फिस्कटली डील

Paternity Leave: CM विजय यांचा क्रांतिकारी निर्णय; आता बाळाच्या जन्मावेळी वडिलांनाही मिळणार १५ दिवसांची सुट्टी

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

८४ व्या वर्षीही आशा पारेख घेतात फिटनेसची काळजी! रात्रीच्या जेवणात असतं खास कॉम्बिनेशन

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

SCROLL FOR NEXT