Railway News  esakal
मुंबई

Railway News: रेल्वे भरती प्रक्रियेसाठी वार्षिक कॅलेंडर जाहीर

CD

रेल्वे भरती मंडळाने या वर्षीच्या रेल्वे भरती परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. रेल्वेने एसएससी आणि यूपीएससीप्रमाणे वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यानुसार रेल्वेने हे कॅलेंडर रेल्वेने प्रसिद्ध केले असून यात वर्षभरात घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेतील भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेमुळे रेल्वे भरती प्रक्रियेला गती मिळेल आणि विहित प्रवर्गासाठी विहित मुदतीत परीक्षा घेता येईल. त्यामुळे रेल्वे भरती परीक्षेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना पूर्वनिश्चित पद्धतीने परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे.

नव्या वार्षिक कॅलेंडरनुसार, टेक्निशियनची भरती एप्रिलमध्ये, एनटीपीसी भरती जूनमध्ये आणि लेव्हल-१ भरती ऑक्टोबरमध्ये होणार आहे. एप्रिलमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू नये म्हणून यंदा तंत्रज्ञांची भरती फेब्रुवारीमध्ये केली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

रेल्वे भरती कॅलेंडर २०२४
असिस्टंट लोको पायलटची भरती जानेवारी-मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत तंत्रज्ञ पदांसाठी भरती होणार आहे. यानंतर जुलै-सप्टेंबरमध्ये नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी एनटीपीसी पदवी स्तर ४, ५, ६ साठी भरती होईल.

या कालावधीत रेल्वे कनिष्ठ अभियंता आणि पॅरामेडिकल श्रेणीसाठीदेखील भरती केली जाईल. तसेच रेल्वे श्रेणी- १(ग्रुप डी भरती) आणि मंत्री आणि पृथक श्रेणीची भरती ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात होणार आहे.

वार्षिक कॅलेंडरचे फायदे
- उमेदवार एका संधीत पात्र ठरला नाही तर भविष्यात त्याच्यासाठी अधिक संधी असणार.
- प्रत्येक वर्षी पात्र ठरलेल्या उमेदवारांना समान संधी असतील.
- निवडलेल्यांना उत्तम करिअर प्रमोशनची शक्यता असेल.
- निवड प्रक्रिया, प्रशिक्षण आणि नियुक्त्या जलद केल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT