crime news pimpri mob collect hafta from shopkeeper two arrested by police esakal
मुंबई

Ambarnath Mob Linching: दुहेरी हत्याकांडमुळे उडाली खळबळ; चोर समजून लाठ्या,काठ्यांनी जीवे मारले

अंबरनाथमधील जमावाचा क्रूरपणा: चोरीच्या संशयावरून दोन तरुणांची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा

Ambarnath News: चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून दोन तरूणांना झालेल्या बेदम मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१६) रात्री घडली.

याप्रकरणी १५ ते २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशी करून आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सूरज परमार (वय२५) आणि सूरज कोरी अशी मृतांची नावे आहेत.

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागातील दुर्गापाडा परिसरात शुक्रवारी (ता.१६) दोघा जणांना चोरी केल्याच्या संशयावरून काही लोकांनी पकडले. दोघांनाही मारहाण करत असताना जमाव वाढत गेला. तेव्हा जमावाने दोघांनाही लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.

यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या डॉ. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

याप्रकरणी १५ ते २० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्याकांडाचा तपास शिवाजीनगर पोलिस आणि उल्हासनगर क्राईम ब्रांच यांच्याकडून सुरू आहे. दरम्यान मृत झालेले दोन्ही तरुण भुरटे चोर असल्याचे सांगण्यात येत असून ते दोघेही अंबरनाथच्या प्रकाश नगर परिसरात राहत असल्याचे पोलिसंनी सांगितले.

याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासानंतर आरोपींना अटक करण्यात येईल, असे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT