ST News mumbai  
मुंबई

ST News| अटल सेतूवरून उद्यापासून धावणार ‘शिवनेरी’

प्रायोगिक तत्त्वावर पुणे-मंत्रालय बस सकाळी ६.३० व स्वारगेट-दादर बस सकाळी ७ वाजता सुटणार आहेत. या बस पुणे येथून निघून थेट पनवेल न्हावाशेवा, शिवडीमार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील.

सकाळ वृत्तसेवा

एसटी महामंडळाने देशातील सर्वाधिक लांबीच्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरून पुणे-मंत्रालय, स्वारगेट-दादर शिवनेरी बस उद्यापासून (ता. २०) मार्गस्थ करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर पुणे-मंत्रालय बस सकाळी ६.३० व स्वारगेट-दादर बस सकाळी ७ वाजता सुटणार आहेत. या बस पुणे येथून निघून थेट पनवेल न्हावाशेवा, शिवडीमार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील.

पुन्हा अनुक्रमे सकाळी ११ व दुपारी १ वाजता या बस मंत्रालय व दादर येथून निघतील. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे एक तास वाचणार आहे.

एसटीच्या शिवनेरीची सेवा सुरू ठेवण्यापूर्वी महामंडळाने प्रवाशांचा अभिप्राय घेतला होता. यात दादर-शिवडी-अटल सेतू-गव्हाण फाटा-कोन-यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्गे पुणे अशा शिवनेरी प्रवासात एका तासाची बचत होत असल्याचे समोर आले.

तर दादर-शिवडी-अटल सेतू-चिरनेर-खारफाटा-पेणमार्गे अलिबाग या प्रवासात दीड तासांची बचत होत आहे, असा शेरा एसटीच्या वाहतूक विभागाचा आहे.

यामुळे पुणेपाठोपाठ लवकरच अलिबागकरांनाही परवडणाऱ्या तिकिटात अटल सेतूची सफर करता येणार आहे. शिवनेरी बसच्या तिकीट दरात कोणताही बदल केलेला नाही. प्रवाशांनी या बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

या बस फेऱ्या एसटीच्या अधिकृत मोबाईल ॲपवर व संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT