mosquto Sakal
मुंबई

Mumbai News: डेंग्‍यूचा डास आढळल्‍यास मनपा करणार कडक कारवाई!

कीटक नाशक विभागाची मोहीम; दंड आकारणार; Municipality will take strict action if dengue mosquito is found!

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटक नाशक विभागाने आतापासूनच कंबर कसली आहे. एडिस डासांची उत्पत्तीस्थाने असलेल्‍या ठिकाणी प्रथम समज, नंतर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ‘एडिस’ डासांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण झोपडपट्टी विभाग पिंजून काढला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत सुरू करून ती मुदतीत संपवण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे.(mosquito menace)


अपुरी नालेसफाई, खड्डेमय रस्ते, कचऱ्याचे ढीग यामुळे पावसात पाणी तुंबून मुंबईकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पाणी साचत असल्याने अस्वच्छता निर्माण होऊन आरोग्याच्या समस्या उद्भभवतात.

त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार रोखण्यासाठी कीटक नाशक विभागाने अडगळीच्या ठिकाणांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यापासूनच ही मोहीम हाती घेतली जाणार असून दर १५ दिवसांनी वॉर्ड स्तरावर झाडाझडतीचा आढावा घेण्यात येणार आहे.(A 3rd of group surveyed say kin hit by mosquito menace)

स्‍वच्छता राखण्याचे आवाहन


‘एडिस’ डास आढळल्‍यास संबंधित सोसायटी, दुकाने यांना स्वच्छता राखणे, स्वच्छ पाणी साठवून ठेवू नये, अशा सूचना करण्यात येणार आहेत. पालिकेच्या सूचनेनंतरही दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खाजगी, सरकारी जागा रडारवर


पावसाळी आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. खाजगी व सरकारी जागांमध्ये ठेवले जाणारे भंगार सामान, पाणी साचले आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर विभागनिहाय यादी तयार करण्यात येईल. ही यादी संबंधित कमिटीला सादर करण्यात येणार आहे. (Swarming mosquitoes put BMC’s deep cleaning drive test Mumbai news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT