Drink & Drive Crime esakal
मुंबई

Drink And Drive: नवी मुंबईत वाहतूक पोलिसांची २५७ वाहन चालकांवर कारवाई

वाहनचालकांनी मद्यसेवन न करता सुरक्षितपणे वाहन चालवावे, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे

CD

Navi Mumbai: नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी १ ते २४ फेब्रुवारीदरम्‍यान ड्रंक ॲन्ड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून २५७ मद्यपीचालकांची धरपकड केली आहे.

मद्यपी वाहनचालकांकडून होणाऱ्या अपघातात निष्पाप लोकांचा हकनाक बळी जातो.

याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून नियमित ड्रंक ऍन्ड ड्राईव्हची मोहीम राबवण्यात येते. मात्र त्यानंतरही मद्यपींकडून वाहन चालवण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.


वाशी, एपीएमसी, कोपरखैरणे, रबाळे, तुर्भे, सीवुडस्, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल व इतर अशा एकूण १६ वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये मोहीम राबवण्यात आली.

ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची मोहीम नियमितपणे सुरू राहणार असून वाहतूक नियमांची पायमल्ली करून बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी मद्यसेवन न करता सुरक्षितपणे वाहन चालवावे, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्‍त तिरुपती काकडे यांनी केले आहे.(Navi Mumbai)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT