Mumbai News sakal
मुंबई

Mumbai News: धारावी वाचवण्यासाठी उद्या जाहीर सभा; लाखाहून आधिक नागरिक होणार सहभागी

सभेच्या तयारीसाठी आंदोलनाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dharavi News: धारावी बचाव आंदोलनातर्फे ‘अदानी हटाओ, धारावी बचाव’साठी १ मार्चला सायंकाळी ६ वाजता संत रोहिदास मार्गाजवळ जाहीर सभा होणार आहे. सभेच्या तयारीसाठी आंदोलनाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

सभा यशस्वी करण्यासाठी धारावीत चौक सभा घेण्यात येत आहेत. या चौक सभेत पत्रक वाटून सभेला येण्याचे आवाहन रहिवाशांना केले जात आहे.(dharavi vs adani)

आंदोलनातर्फे धारावीत सभेचे पोस्टर लावले जात आहेत. सभेला एक लाखाहून अधिक धारावीकर उपस्थिती लावतील, असे नेत्यांचे म्हणणे आहे. अदानी कंपनीच्या वतीने धारावीतील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यासाठी ६०० लोकांना काम देणार असल्याचे बोलले जात आहे.

अपात्र ठरणाऱ्यांना मुलुंड, वडाळा, कांजूरमार्ग आणि भांडुपमध्ये पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अदानी कंपनीची निविदा रद्द करा, धारावीतील सर्व बांधकामांना पात्र करावे, किमान ५०० चौरस फुटांची घरे धारावीतच द्यावीत, धारावीचा विकास म्हाडाने करावा, या आंदोलकांच्या मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT