Crime News sakal
मुंबई

Crime News: उत्तरप्रदेशातील तुरुंगातून फरार आरोपीला पनवेलमधून अटक

१ नोव्हेंबर २०२२ रोजी देवरिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.

CD

Crime News: हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी दिलेली असताना उत्तर प्रदेशातून पळून आलेल्या आरोपीला वाराणसी एसटीएफच्या पथकाने पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने पनवेल रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले.

प्रवीण ऊर्फ प्रदीप रामआजोर पाल (वय २५) असे या आरोपीचे नाव असून उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. (crime panvel news)


प्रवीण ऊर्फ प्रदीप रामआजोर पाल याला ऑक्टोबर २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमधील रामकोला पोलिसांनी हत्येच्या गुह्यात अटक केली होती.(mumbai crime)

त्यांनतर कुशीनगर येथील न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी ठोठावल्यानंतर त्याची रवानगी देवरिया येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. यादरम्यान त्याला १ नोव्हेंबर २०२२ रोजी देवरिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.

याच वेळी आरोपी प्रवीणने पोलिसांच्या तावडीतून पलायन केले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील कोतवाली पोलिसांनी त्याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. या आरोपीला पकडून देणाऱ्या व्यक्तीला ५० हजार रुपयाचे बक्षीसदेखील देवरिया पोलिस अधीक्षकांनी जाहीर केले होते.

तेव्हापासून उत्तर प्रदेश पोलिसांकडून या फरार आरोपीचा शोध घेण्यात येत होता. सदर आरोपी हा पनवेलमध्ये असल्याची गोपनीय व तांत्रिक माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.(panvel crime)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT