Mumbai Modi Lipi News  sakal
मुंबई

Mumbai News: ‘एसएनडीटी’मध्ये मोडी लिपी कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये नुकतीच ‘मोडी लिपी’ प्रचार आणि प्रसार ही एक दिवसाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेला विद्यार्थिनी, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून सहभाग नोंदवला.

विद्यापीठातील इतिहास विभाग, पुराभिलेख संचालनालय तसेच एसएनडीटी कला श्री. चं. भो. वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी कार्यशाळेचे उद्‌घाटन केले.

या कार्यशाळेत मोडी लिपीतील अक्षर वळण, बाराखडी आणि संक्षिप्त रूपे याची माहिती देण्यात आली. पुराभिलेख संचालनालयाच्या सायली पिंपळे, महेश राजपूत आणि प्रतीक्षा कदम यांनी मार्गदर्शन केले. डॉ. रामकुमार प्रधान यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेमुळे आम्हाला मोडी लिपी शिकायला मिळाली, आम्हाला ऐतिहासिक पत्रे वाचून अर्थबोध होईल, अशी प्रतिक्रिया बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग


कार्यशाळेत ७० जण सहभागी झाले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता. महाविद्यालयातील हिंदी, गुजराती, इंग्रजी, मराठी अशा सर्व माध्यमातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मुलींनी या कार्यशाळेत भाग घेतला होता.

या कार्यशाळेत काहींनी आपल्या घरातील मोडी लिपीतील जुनी कागदपत्रे वाचता यावी, म्हणून सहभाग घेतला तर इतिहासविषयक संशोधनात उपयोग होईल, म्हणून अनेक विद्यार्थिनींनी नाव नोंदवले.

कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला, हे बघता विद्यापीठात मोडी लिपीवर विशेष अभ्यासक्रम सुरू करणार आहे.


- डॉ. जास्वंदी वांबूरकर, प्राचार्या आणि इतिहास विभागप्रमुख

पेशवे काळातील पुस्तके वाचत होतो; पण मोडी लिपी कळत नव्हती. आता या कार्यशाळेत आल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.


- आदेश शिंदे, रुईया कॉलेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT