Rahul Gandhi in Thane sakal
मुंबई

Thane News: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात धडाडणार राहुल गांधींची तोफ; शिंदेंना बसणार धक्का?

‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान गांधी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात

सकाळ वृत्तसेवा

Rahul Gandhi in Thane : भाजपला रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी देशात ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यातील या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील यात्रा जोमाने सुरू आहे.

त्यात येत्या १५ आणि १६ मार्चला राहुल गांधी यांची ही यात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून जाणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी हे ठाणे शहरात सभा घेणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी या सभेत काय बोलणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.(rahul gandhi in thane)

ठाणे हा पूर्वी काँग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार आणि खासदार होते. तर ठाणे जिल्हा परिषदेवरदेखील काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात काँग्रेसची होणारी पिछेहाट, ठाणे पालिकेत अवघे तीन नगरसेवक तर, जिल्हा परिषदेत एकही सदस्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसची अवस्था अधिकच बिकट होत आहे. त्यात राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. (ekanth shinde rahul gandhi)

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस या महायुतीच्या नेत्यांकडून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. अशातच आता, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ही न्याययात्रा भिवंडी आणि ठाणे शहरातून जाणार आहे. या यात्रेचे नियोजन आणि कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी ठाणे काँग्रेस मुख्यालयात बैठक घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.(ekanth shinde congress thane)

दरम्यान, थोरात यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, १२ मार्चला ही न्याययात्रा गुजरातमधून राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिकमार्गे ती १५ मार्चला वाडा, भिवंडी येथे येणार आहे.

१६ मार्चला ही यात्रा ठाणे शहरात दाखल होईल. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची सभा होणार आहे. यानंतर ही यात्रा मुलुंड येथे थांबेल आणि १७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. (Bharat Jodo Nyay Yatra Thane)

राहुल गांधी यांचा जनतेशी संवाद


भिवंडी येथून मुंबई-नाशिक महामार्ग भारत जोडो न्याय यात्रा खारेगावमार्गे मुंब्रा-कौसा, कळवा, कोर्टनाका, जांभळीनाका, राम मारुती रोड, गोखले रोड, तीन हात नाका येथून मुलुंडला जाईल. जांभळी नाका येथे राहुल गांधी हे यात्रेच्या वाहनांवरूनच सभा घेऊन उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. (Bharat Jodo Nyay Yatra Mumbai)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT