Railway News sakal
मुंबई

Railway News: पश्चिम रेल्वेवरील लोकल आणि एक्सप्रेस होणार शॉर्ट टर्मिनेटेड; जाणून घ्या कारण

पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड आणि अंशत: रद्द केल्या जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: ‘मिशन रफ्तार’ अंतर्गत मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा वेग ताशी १६० किमीपर्यंत वाढवण्यासाठी रेल्वे रुळांचे अद्ययावतीकरण करण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत आहे.(virar surat railway Block)

रविवारी (ता.३) या कामासाठी विरार ते सुरतदरम्यान ‘ट्रॅफिक कम पॉवर ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड आणि अंशत: रद्द केल्या जाणार आहेत.(mumbai local)

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विरार आणि सुरत विभागादरम्यान रेल्वे गाड्यांचा वेग १६० किमी प्रतितासापर्यंत वाढवण्याचे काम पूर्ण करण्यासाठी ३ मार्चला ‘ट्रॅफिक कम पॉवर ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी ९.१० ते १०.३० वाजेपर्यंत विरार-सुरत दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर असणार आहे.(wester railway powar block)

या ब्लॉक कालावधीत ट्रेन क्रमांक १२९३४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस २५ मिनिटांसाठी नियमित केली जाणार आहे. ब्लॉकदरम्यान डहाणू ते वाणगावदरम्यान लोकल सेवा रद्द असणार आहे. सकाळी ७.१७ चर्चगेट-डहाणू रोड लोकल वाणगाव स्टेशनपर्यंत धावणार आहे. (mission rafter )

तर परतीच्या डहाणू रोड-विरार लोकल वाणगाव येथून सकाळी ९.५० वाजता सुटणार आहे. सकाळी ७. ४२ वाजताची चर्चगेट-डहाणू रोड लोकल वाणगावपर्यंत चालवण्यात येणार आहे. परतीची डहाणू रोड-विरार लोकल वाणगाव येथून सकाळी १०.२५ वाजता सुटेल.(mumbai Local News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT