Railway station news
Railway station news Sakal
मुंबई

Railway News: रूळ ओलांडण्याला बसणार आळा; रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय!

CD

Navi Mumbai : रेल्वे रूळ ओलांडताना अनेक लोक जिवाला मुकतात. हे अपघात टाळण्यासाठी रेल्वेच्या वतीने रेल्वे रुळांवर पादचारी पुलांचीही उभारणी केली गेली आहे. मात्र, अनेक प्रवासी वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याची चूक करत असतात.

त्यामुळे प्रवाशांनी रूळ ओलांडू नये, म्हणून रेल्वे रुळालगत लोखंडी जाळ्या आणि सिमेंटच्या भिंती उभारण्याचे काम हार्बर रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर इथून पुढे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रकाराला आळा बसेल.

हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानके मुंबई आणि इतर रेल्वे स्थानकांपेक्षा वेगळी आहेत. इथल्या रेल्वे स्थानकात कुठेही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स नाहीत. शिवाय स्थानकात दोन्ही दिशेला उतरण्याची सुविधा आहे. त्यामुळे इतर स्थानकांप्रमाणे इथे प्रवाशांची गर्दी होत नाही.

मात्र, याठिकाणी सर्रासपणे रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार होत असतात. रेल्वे आली की प्रवासी उतरून, रेल्वे स्थानकाबाहेर जाण्यासाठी जिन्यांचा नाही तर रेल्वे रुळांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.(railway News)

बऱ्याच वेळा रेल्वे बदलून प्रवास करायचा असल्यास बहुतांश प्रवासी रेल्वे रूळ ओलांडूनच रेल्वे पकडतात. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात. हे टाळण्यासाठी हार्बर रेल्वेने या चोरवाटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाशी स्थानकापासून बेलापूर रेल्वे स्थानकात सध्या रेल्वे फलाटावर बाहेरून येण्या-जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. इथे पूर्वी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या होत्या.

मात्र, आता सिमेंटच्या संरक्षक भिंती उभारल्या जात आहेत. रेल्वेच्या सुरुवातीच्या फलाटाकडे आणि शेवटच्या फलाटाकडे दोन्ही दिशेला या संरक्षण भिंती उभारल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता जिने चढूनच दुसऱ्या फलाटावर किंवा रेल्वे स्थानकातून बाहेर पडता येणार आहे.

फुकट्या प्रवाशांनाही बसणार चाप


अनेकवेळा प्रवासी तिकीट न काढता स्थानकाच्या बाहेरून थेट फलाटावर येत असतात. आणि ट्रेनमधून उतरून बाहेरच्या बाहेर निघूनही जात असतात.

बहुतेकवेळा तिकीट तपासनीस हे फलाटाच्या मधोमध किंवा बाहेर पडण्याच्या मार्गावर उभे असतात. त्यामुळे फुकट्या प्रवाशांना सहजपणे बाहेरच्या बाहेर निसटता येत असते. मात्र, या संरक्षक भिंतीमुळे प्रवाशांच्या या चोरवाटा बंद झाल्या आहेत. यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनाही आळा बसणार आहे.


नेरूळ रेल्वे स्थानकात अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडूनच प्रवास करतात. इथे ठाणे, नेरूळ, पनवेल, सीएसटी आणि आता नेरूळ, उरण या तीन वेगळ्या मार्गांच्या रेल्वे येतात. या ठिकाणी अनेकांना एक रेल्वे सोडून दुसरी रेल्वे पकडण्याची घाई असते. त्यामुळे प्रवासी रेल्वे रूळ ओलांडूनच रेल्वे पकडण्याची घाई करताना दिसतात. त्यामुळे अनेकवेळा रेल्वे आली की गोंधळ होतो. मात्र, यापुढे हा गोंधळ थांबेल, असे वाटते. (navi mumbai News)


- नितीन कुंभार, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

Chandrapur Exit Poll: सुधीर मुनगंटीवार यांचं काय होणार? एक्झिट पोल सांगतोय धक्कादायक अंदाज

SCROLL FOR NEXT