Railway News sakal
मुंबई

Railway News: भुसावळ- मुंबई सेंट्रल आणि पुणे-इंदूर दरम्यान विशेष गाड्यांना मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

Railway News: मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत भुसावळ ते मुंबई सेंट्रल आणि पुणे ते इंदूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (mumbai bhusawal railway)


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९०५१ मुंबई सेंट्रल- भुसावळ त्रि-साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसची मुदत आता ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत आहे. ट्रेन क्रमांक ०९०५२ भुसावळ-मुंबई सेंट्रल त्रि-साप्ताहिक विशेषची मुदत १ मे पर्यंत वाढविण्यात येत आहे. ट्रेन क्रमांक ०९३२४ इंदूर-पुणे साप्ताहिक विशेष २४ एप्रिल, तर ट्रेन क्रमांक ०९३२३ पुणे-इंदूर साप्ताहिक विशेषची मुदत २५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.(Railway News)

त्यामुळे भुसावळ ते मुंबई सेंट्रल आणि पुणे ते इंदूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मुदत वाढविण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे.(Maharashtra News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father Kills Son : सांगलीत मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात बापाने घातला दगड; सततच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य, कासेगाव पोलिसांत गुन्‍हा

Hingoli News: तहानलेल्या वानरांसाठी पाण्याची सोय; हयातनगर येथील शेतकरी विजय पाटील यांचा पुढाकार

Beed News: पोस्ट ऑफिस आहे की जनरल स्टोअर?; पत्रे दुकानात अन् कर्मचारी सुस्त; नागरिक संतप्त, सेवेेचा लाभ मिळणार तरी कसा?

Beed News: ‘सीतेच्या न्हाणी’चे वैभव पडले अडगळीत; विकासाचा वनवास; किल्ले धारूरच्या ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था वाढली

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT