मुंबई

Thane News: सुनेच्या जाचाला कंटाळून सासूने संपवले जिवन

पोलिसांना घटनास्थळावरून १२ पानांची सुसाईड नोट आढळून आली आहे. स्नेहल या मुंबईतील पवईमध्ये राहण्यास आहेत

Chinmay Jagtap, सकाळ वृत्तसेवा

Thane News| वारंवार सासूशी वाद करणे, तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देणे; तसेच इथे राहू नको, आश्रमात जा, अशी टोमणे मारणाऱ्या सुनेच्या छळाला कंटाळून वृद्धा सुषमा विलास खैरनार (६१) यांनी अखेर शनिवारी (ता. २) घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली

याप्रकरणी सुषमा यांची विवाहित मुलगी स्नेहल शेट्टी (३९) यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात सून गौरी आणि भाऊ राहुल यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून १२ पानांची सुसाईड नोट आढळून आली आहे.
स्नेहल या मुंबईतील पवईमध्ये राहण्यास आहेत.

सुषमा यांना एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार होता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्या मुलगा राहुल (४१) आणि मुलगी स्नेहल यांच्यासोबत नौपाडा पोलिस ठाणे हद्दीतील दीपश्री सोसायटीमध्ये राहत होते. राहुलचा गौरी निकूम (३५) हिच्याशी २०१३ मध्ये विवाह झाला. त्यानंतर सुनेने त्‍यांचा छळ करण्यास सुरुवात केली. अखेर रोजच्या वादाला कंटाळून दोघेही वेगळे राहण्यास गेले. त्यात मुलगी स्नेहलचा २०२२ मध्ये सदानंद शेट्टी यांच्याशी विवाह झाला.. याप्रकरणी सुषमा यांची विवाहित मुलगी स्नेहल शेट्टी (३९) यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात सून गौरी आणि भाऊ राहुल यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून १२ पानांची सुसाईड नोट आढळून आली आहे.
स्नेहल या मुंबईतील पवईमध्ये राहण्यास आहेत.

सुषमा यांना एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार होता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्या मुलगा राहुल (४१) आणि मुलगी स्नेहल यांच्यासोबत नौपाडा पोलिस ठाणे हद्दीतील दीपश्री सोसायटीमध्ये राहत होते. राहुलचा गौरी निकूम (३५) हिच्याशी २०१३ मध्ये विवाह झाला. त्यानंतर सुनेने त्‍यांचा छळ करण्यास सुरुवात केली. अखेर रोजच्या वादाला कंटाळून दोघेही वेगळे राहण्यास गेले. त्यात मुलगी स्नेहलचा २०२२ मध्ये सदानंद शेट्टी यांच्याशी विवाह झाला.

मुलगी सासरी निघून गेल्यानंतर पुन्हा राहुल आणि गौरी हे दीपश्री सोसायटीमध्ये राहण्यास आले. मात्र, गौरीने पुन्हा सासूचा छळ करण्यास सुरुवात केली. अखेर जाचाला कंटाळलेल्या सुषमा यांनी घरातील पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी स्नेहलने नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांनी घरात शोध घेतला असता कपाटात सुषमा यांनी १२ पानांची सुसाईड नोट लिहिलेली आढळली. यामध्ये त्यांनी सून आणि मुलगा यांनी दिलेल्या त्रासाची माहिती होती. पोलिसांनी ती ताब्यात घेऊन गौरी आणि राहुलविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT