मुंबई

Mumbai Bjp: महिला सक्षमीकरणासाठी भाजप हा एकमेव पर्याय - विनय सहस्त्रबुद्धे

उद्‍घाटन सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी महिलांसोबत संवाद साधला | latest marathi News |

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai: महिलांसाठी धडाडीचे निर्णय फक्त भाजपच घेऊ शकते. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूकप्रमुख विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

बेलापूर विधानसभा क्षेत्रात आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून नेरूळ येथील सेक्टर १२ मधील तेरणा हायस्कूल मैदान या ठिकाणी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. याचे उद्‍घाटन सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी महिलांसोबत संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या संकल्पनेने देशातील कोट्यवधीपेक्षा जास्त महिलांना जोडून घेण्याकरिता भारतीय जनता पक्षातर्फे ‘नारी शक्ती वंदन’ अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने नेरूळ येथे मेळावा पार पडला. कणखर आणि सक्षम महिला विधिमंडळात आल्यानंतर किती चांगली कामगिरी होते, हे मंदा म्हात्रे यांच्या कार्यपद्धतीतून सर्वांसमोर आहे. नवी मुंबईला हे पोलादी नेतृत्त्व लाभले आहे, असेही ते म्हणाले.

महिला सक्षमीकरणासाठी भाजप हा एकमेव पर्याय असल्याची भावना मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राला राजमाता जिजामाता, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे अशा कणखर आणि सक्षम महिला नेतृत्वाची परंपरा आहे.

आज विधिमंडळात लोकांचे प्रश्‍न मांडताना माझ्या मनात या सगळ्या महिलांची प्रतिमा असते. महिलाशक्तीच या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला पुढे नेईल. त्या विचारांतूनच हा महिला मेळावा आयोजित केला आहे, असे मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

आपली नवी मुंबई टाइम्स’चे प्रकाशन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या महिलांना पश्‍चिम बंगालमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. तसेच आमदार म्हात्रे यांच्या बेलापूर विधानसभा क्षेत्रात होत असलेल्या विकासकामांची प्रचिती पाहता विनय सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरूळ येथील माजी नगरसेविका सुनीता शेट्टी यांच्यासह, तसेच सीबीडी येथील अमृता पवार, पुष्पा राठोड यांच्यासह असंख्य महिलांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. तसेच वाशी येथील विकास सोरटे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नव्याने प्रकाशित केलेल्या ‘आपली नवी मुंबई टाइम्स’ या साप्ताहिक वृत्तपत्राचे प्रकाशन सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT