Crime News esakal
मुंबई

Navi Mumbai Crime: ६ लाखांच्या गांजासह दोघांना झाली अटक

एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून नीलेश देशमुख व अर्जुन देवकर हे दोघे संशयीतरीत्या आले असता पथकाने दोघांची धरपकड केली.

CD

Navi Mumbai News: पनवेलमधील शेडुंगकडून पळस्पेकडे जाणाऱ्या रस्त्यावर आजिवली गाव येथे कारमधून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली.

नीलेश लक्ष्मण देशमुख (३५) व अर्जुन कैलास देवकर (२५) अशी या दोघांची नावे असून पथकाने त्यांच्या कारमध्ये असलेला तब्बल सहा लाख ८८ रुपये किमतीचा ३४ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा व १० लाख रुपये किमतीची कार जप्त केली.

पनवेलमधील शेडुंगकडून पळस्पेकडे जाणाऱ्या रोडवर आजिवली गाव येथील जरीमरी ढाब्याजवळ दोन व्यक्ती कारने गुरुवारी रात्री गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती.

माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज चौधरी व त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री आजिवली गाव येथील जरीमरी ढाब्याजवळ सापळा रचला होता. रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून नीलेश देशमुख व अर्जुन देवकर हे दोघे संशयीतरीत्या आले असता पथकाने दोघांची धरपकड केली.


३४ किलो गांजा, कार जप्त
पोलिसांनी केलेल्या तपासणीत कारमध्ये दोन पिशव्यांमध्ये ३४ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. अमली पदार्थविरोधी पथकाने नीलेश देशमुख व अर्जुन देवकर या दोघांविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. या कारवाईत १० लाख रुपये किमतीची इर्टिगा कारदेखील जप्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

SCROLL FOR NEXT