Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime: फसवणुकीच्या १० वर्षे जुन्या प्रकरणातील आरोपी अटकेत

आणखी तीन फसवणुकीच्या गुन्ह्यांसाठी पोलिसांना त्याच्या कोठडीची आवश्यकता आहे. तसेच त्याच्यावर भांडुप पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत

CD

Mumbai Crime: दहा वर्षे जुन्या फसवणुकीच्या प्रकरणात कुविख्यात हिस्ट्रिशीटरला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. बरकत अली सैफुल्ला बेग असे वॉण्टेड आरोपीचे नाव आहे. (mumbai crime news )

पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी नुकतेच तपासासाठी प्रलंबित प्रकरणांचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले होते. बेगवर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. संबंधित गुन्ह्यात आरोपी बेगने ‘सीबीआय’ अधिकारी सांगून अनेक पीडित व्यक्तींकडून पैसे उकळले आणि त्यानंतर तो फरारी झाला होता. (mumbai fraud news)

बेगचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले. गुप्त माहितीदारांकडून आरोपीच्या ठिकाणाचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर भिवंडी येथे सापळा रचून त्याला शुक्रवारी (ता. ८) रात्री अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आणखी तीन फसवणुकीच्या गुन्ह्यांसाठी पोलिसांना त्याच्या कोठडीची आवश्यकता आहे. तसेच त्याच्यावर भांडुप पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.(maharashtra news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT