Crime News esakal
मुंबई

Crime News: घरफोडी करून पळालेल्या वसईतील चोरांना नाशिकमधून अटक

माणिकपूर आणि नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून टोळीतील तिघांना बेड्या ठोकण्यात यश आले

CD

Nalasopara News: सई पश्चिम आनंद नगर परिसरात दिवसा घरफोडी करून गोरखपूर एक्स्प्रेसने फरारी झालेल्या टोळीला ७२ तासांत नाशिक रोड रेल्वेस्थानकात अटक करण्यात आली आहे.

माणिकपूर आणि नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून टोळीतील तिघांना बेड्या ठोकण्यात यश आले असून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सात लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.(railway police News )

वसई पश्चिमेकडील आनंद नगर येथील ‘अंबा भवन’ या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कल्पना मोरे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सात लाखांहून अधिकचा मुद्देमाल ७ मार्चला चोरला होता.

याबाबत माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी पीएसआय यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक निर्माण केले होते.

या पथकाने घटनास्थळावरील सीसी टीव्ही, तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोरखपूर एक्स्प्रेसने फरारी होणाऱ्या राकेशकुमार ऊर्फ चिक्की राजाराम यादव (वय ३३), मोहम्मद सईद ऊर्फ शानू गरीबउल्ला खान (वय ३७), लालकेशर ऊर्फ बच्चा ददन राय (वय २७) यांना अटक केली. तीनही आरोपी गोरेगाव, मालाड, वसई परिसरातील राहणारे असून वसई न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

आरोपींकडून ४ लाख ६७ हजार रुपये किमतीचे १०१.४१ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन लाख ६९ हजार ८०० रुपयांची रोख, दोन मोबाईल फोन, एक अॅक्टिव्हा गाडी असा सात लाख ५२ हजार ३६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोरेगाव पोलिस ठाण्यात अटक केलेल्या दोघांवर सहा गुन्ह्यांची नोंद आहे.


- पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

SCROLL FOR NEXT