Navi Mumbai mahapalika  esakal
मुंबई

Navi Mumbai: आयुक्तांच्या बदलीमुळे महापालिकेच्या चार उपायुक्तांवर अतिरिक्त भार

Navi Mumbai Municipal Commissioner Rajesh Narvekar has given additional charge to four Deputy Commissioners to facilitate administrative work before his transfer.

सकाळ वृत्तसेवा

Vasi News: नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्या बदलीपूर्वी प्रशासकीय कामकाज सोयीचे होण्यासाठी चार उपायुक्तांकडे अतिरिक्त पदभार दिला आहे. पालिकेतील अतिरिक्त अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे मूळ पदासोबत अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची बदली झाल्यानंतर त्या जागी डॉ. कैलास शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. नार्वेकर यांच्या बदलीपूर्वी (२० मार्च) प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ सामान्य प्रशासनाचे उपायुक्त शरद पवार यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (१) त्याचप्रमाणे कर विभाग (मालमत्ता कर व इतर), वाहन-यांत्रिकी आणि निवडणूक विभागाचा कारभार देण्यात आला आहे.

अतिरिक्त अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (२) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिक्रमण उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्याकडे मालमत्ता, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग देण्यात आला आहे. चंद्रकांत तायडे यांना परिमंडळ-२ देण्यात आले आहे.

समाज विकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांच्यावर पशु वैद्यकीय, परवाना व ग्रंथालय विभाग, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामकाज देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT