Crime sakal
मुंबई

Mumbai Crime: मंदिरा जवळ भटक्या श्‍वानांना खाऊ घातले मांस; गुन्हा दाखल

महालक्ष्मी मंदिराजवळ भटक्या श्‍वानांना मांस खाऊ घातले म्हणून येथील दोन महिलांवर गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे | A case has been registered in Gadevi police station against two women here for feeding meat to stray dogs near Mahalakshmi temple.

सकाळ वृत्तसेवा


मुंबई, ता. २३ : महालक्ष्मी मंदिराजवळ भटक्या श्‍वानांना मांस खाऊ घातले म्हणून येथील दोन महिलांवर गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक ठिकाणाची विटंबना केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. नंदिनी बेलेकर आणि पल्लवी पाटील अशी या महिलांची नावे आहेत.

नंदिनी बेलेकर या अनेकदा महालक्ष्मी मंदिराच्या आवारात भटक्या श्‍वानांना मांसाचे तुकडे खायला टाकतात, अशी तक्रार येथे येणारे भाविक अनेक दिवसांपासून करत होते. त्यानंतर मांस खाऊ न घालता इतर पदार्थ खाऊ घालावेत असे निर्देश मंदिर समितीने बेलेकर यांना दिले होते. पण बेलेकर यांनी त्याचे पालन केले नाही.

त्यामुळे त्यांच्याविरोधात शीला शहा यांनी तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार नंदिनी बेलेकर यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी, तर पल्लवी पाटील यांच्यावर शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास गावदेवी पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT