मुंबई

Mumbai Crime: पोलिस अधिकाऱ्याचाच मुलगा चालवत होता देह व्यापाराचा धंदा; वाचा काय आहे प्रकरण?

The son of a Mumbai police officer has been arrested in connection with a sex racket. The name of the accused is Ashwin Kadam.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: सेक्स रॅकेटप्रकरणी मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. अश्‍विन कदम असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या कारवाईत कृतिका लाड (वय ३१) या महिलेलाही अटक केली असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.


ठाणे गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी कक्षाने गुरुवारी (ता. २१) ही कारवाई केली. अश्‍विन कदम सांताक्रूझचा रहिवासी आहे. ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विश्‍वास व्हेज हॉटेलवर अश्विन हा महिलांना देहव्यापारासाठी आणत असल्याची माहिती कक्षाला मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांकडून सापळा लावून बनावट ग्राहक पाठवून १५ हजार रुपयांत व्‍यवहार ठरवला. यात पैसे घेताच पोलिसांनी कदम याला अटक केली. त्यानंतरच्या तपासात एका महिलेने त्याला गुन्ह्यात मदत केल्याचे उघड झाल्यानंतर शुक्रवारी कृतिका लाड हिला अटक केली. दोघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT