crime news navi mumbai  Sakal
मुंबई

Navi Mumbai: दागिन्यांसह देशीबनावटीचे पिस्टल हस्तगत; पोलिसांची मोठी कारवाई

कळंबोली वाहतूक शाखेचे दोन वाहतूक अंमलदार यांनी संयुक्तरित्या कळंबोली परिसरात ही कारवाई केली |Two traffic enforcers of Kalamboli traffic branch jointly took this action in Kalamboli area

CD

Panvel News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलिस ठाणे हद्दीत कोम्बिंग व ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले.

त्यामध्ये कळंबोली पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह देशी बनावटीचे पिस्टल व तलवार हस्तगत केली आहे. कळबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह सात अधिकारी व २३ अंमलदार, तसेच कळंबोली वाहतूक शाखेचे दोन वाहतूक अंमलदार यांनी संयुक्तरित्या कळंबोली परिसरात ही कारवाई केली.

आरोपी अरबाज शेख याच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे मॅगझीन असलेले स्टील धातूचे एक पिस्टल व तीन हजार रुपये किमतीची तीन पितळी जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. त्याचप्रमाणे आरोपी अश्‍विन सूर्यवंशी याच्याकडून १९ इंच लांबीची तलवार हस्तगत करण्यात आली.

आरोपी अरमानसिंग रंधवा याच्याकडून एक लाख २६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. यासह विविध गुन्ह्यांतील आरोपी, हिस्ट्रीशिटर आणि तडीपार आदी आरोपींची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT