Bribe News sakal
मुंबई

Mira Bhayandar: जामीन मिळवून देण्यासाठी १० लाखांची मागणी; सहायक पोलिस निरीक्षकावर गुन्हा

सहायक पोलिस निरीक्षक कैलास टोकळे यांनी आरोपीच्या भावाकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती |Assistant Police Inspector Kailas Tokale had demanded ten lakh rupees from the accused's brother

CD

Mira Bhayandar: मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षकाने आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी १० लाखांची मागणी केल्याप्रकरणी काशी-मिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

विरार पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात गुन्हे शाखा युनिट एकमध्ये कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक कैलास टोकळे यांनी आरोपीच्या भावाकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती.

यासंदर्भात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर या विभागाने तक्रारीची पडताळणी सुरू केली. १० लाखांपैकी पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता टोकळे घेणार असल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT