मुंबई

Mumbai Crime: पत्नी सोबत राहत नसल्याने दादर, कल्याण स्थानके उडवण्याची दिली धमकी; पोलिसांनी केली अटक

CD

Mumbai Local News: बायको सोबत राहत नाही म्हणून दादर आणि कल्याण रेल्वेस्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास पेल्हार पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.( Crime Investigation Branch of Pelhar Police Station)

विकास शुक्ला (वय ३५) असे अटक केलेल्याचे नाव असून पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अनोळखी मोबाईलवरून २९ मार्चला मिरा रोड येथील मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयात दादर आणि कल्याण रेल्वेस्थानके बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा कॉल आला होता.

या कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले. तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित विकास शुक्ला (वय ३५) याला ताब्यात घेतले.(Suspect Vikas Shukla (age 35) was detained based on information and intelligence.)

त्याची चौकशी केली असता दीड वर्षांपासून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्‍हती. ती दादर येथे कामाला जात होती, तर कल्याणमध्ये राहत असल्याने त्याने ही दोन्ही स्थानके उडवून देण्याची धमकी दिल्याचे त्याने सांगितले.

मात्र त्याच्या कॉलमुळे संपूर्ण यंत्रणाच कामाला लागली. पेल्हार पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(A case has been registered against him in Pelhar police station)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT