crime news navi mumbai  Sakal
मुंबई

Crime News: मोबाईवरून झालल्या भांडणात महिलेचा मृत्यू; पोलिसांनी घेतले दिराला ताब्यात

यशोदा बैत्राम्नी (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे| he dead woman has been identified as Yashoda Baitramni

CD

Mumbai News: मोबाईल हरवल्यावरून घरात झालेल्या भांडणात महिलेचा जीव गेल्याची घटना ऐरोलीतील साईनाथ वाडीमध्ये गुरुवारी (ता. २८) घडली. (navi mumbai Crime)

रबाळे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून महिलेच्या दिराला ताब्यात घेतले आहे. यशोदा बैत्राम्नी (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. (marathi crime news)

यशोदा बैत्राम्नी ही महिला ऐरोलीतील साईनाथ वाडी येथे तिच्या कुटुंबासह राहत होती. काही दिवसांपूर्वी तिचा लहान दीर विष्णू बैत्राम्नी याने तिचा मोबाईल हरवला होता. त्यामुळे आपल्याला नवा मोबाईल घेऊन दे, असा तगादा यशोदा हिने विष्णूकडे लावला होता. गुरुवारी रात्री यशोदाने त्याच्याकडे नव्या मोबाईलबाबत विचारणा केली.

त्यामुळे दोघांत बाचाबाची झाली. त्यांची भांडणे सोडवण्यासाठी यशोदा हिचा मोठा दीर गोपाळ आणि त्याची पत्नी अंजली या दोघांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण विष्णू याने गोपाळला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न अंजली व यशोदा या दोघींनी केला; पण विष्णूने त्या दोघींनाही ढकलून दिले.

यात यशोदाच्या डोक्याला जोराचा मार लागल्यामुळे ती बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिल मृत घोषित केले. त्यामुळे विष्णूविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT