मुंबई

Mumbai News: मुंबईत आतापर्यंत १६.५१ टक्के नालेसफाई; १० मेट्रिक टन गाळ काढण्याचे नियोजन

BMC News: गतवर्षी नालेसफाईच्या कामाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली होती. |Last year, the drain cleaning work started in the first week of March

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पालिकेने सुरू केली आहेत. आतापर्यंत १५ दिवसांत म्हणजे १ एप्रिलपर्यंत १६.५१ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. मिठी नदीची ४८.५८ टक्के सफाई करण्यात आली आहे. अशात ३१ मेपूर्वी १०.२१ लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे नियोजन महापालिकेचे आहे.

महापालिकेने मुंबईतील मिठी नदी, लहान- मोठे नाले, हायवेलगतचे नाले यांच्या सफाईचे २४९.२७ कोटी रुपयांचे काम ३१ कंत्राटदारांवर सोपवले आहे. गतवर्षी नालेसफाईच्या कामाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली होती.

मात्र, यंदा १८ मार्चपासून नालेसफाई कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नालेसफाई कामे उशिराने सुरू झाली असून ती कामे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात आणि पावसानंतर अशा तीन टप्प्यात करणे पालिकेसमोर आव्हान असणार आहे.


यंदा १८ मार्चपासून मिठी नदी, लहान व मोठे नाल्यांच्या सफाई कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेने कंत्राटदारांच्या माध्यमातून १ एप्रिलपर्यंत म्हणजे गेल्या १५ दिवसांत मिठी नदीचे ४८.५८ टक्के सफाई काम केले आहे. शहर व उपनगरांतील लहान- मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य आहे.
------------

कामावर सीसीटीव्हीची नजर


मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीत मुंबईत एका दिवसात तब्बल ९४४ मिमी इतका पाऊस पडला होता. तसेच, त्याचवेळी समुद्राला मोठी भरतीही होती. त्यामुळे मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ मोठी हानी झाली. त्यानंतर मिठी नदीची सफाई केली जाते.

नदीच्या रुंदीकरण, खोलीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील छोट्या- मोठ्या नालेसफाईची कामेही हाती घेऊन वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मिठी नदी व नालेसफाईवर पालिकेकडून सीसीटीव्हीची नजर ठेवली जाणार आहे.
….

दीड लाख मेट्रीक टन गाळ काढला


शहर व उपनगरे येथील लहान-मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य असून त्यापैकी १,६८,६७४.७७ मेट्रिक टन म्हणजे १६.५१ टक्के इतका गाळ काढण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

१) १८ मार्च ते १ एप्रिल या १५ दिवसांत कंत्राटदारांनी १,६८,६८४.७७ मे. टन (१६.५१ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.


२) शहर भागात नालेसफाई कामाच्या अंतर्गत ३०,९३९.९४ मे. टन इतका गाळ काढणे अपेक्षित असून गेल्या १५ दिवसांत त्यापैकी १,७५०.१४ मे. टन (५.६३ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.


३) पूर्व उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत १,२३,५५३.०५ मे. टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी १५,७९०.७८ मे. टन (१२.७८ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.


४) पश्चिम उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत २,३५,०२०.९४ मे. टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी ३०,४२९.१२ मे. टन (१२.९४ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT