मुंबई

शहीद भाई संगारे स्मारकासाठी प्रयत्नांची गरज

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : ज्यांच्या शब्दाशब्दांत असायचे अंगारे, ते होते भाई संगारे, अशी काव्यमय सुरुवात करून तरुणांच्या मानत क्रांती ज्योत पटविणारे शहीद भाई संगारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाड क्रांतीभूमित त्यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करूया, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. भायखळा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे दिवंगत शहीद भाई संगारे यांच्या २५व्या स्मृतिदिनी आयोजित जाहीर श्रद्धांजली सभेत रामदास आठवले बोलत होते.
शहीद भाई संगारे यांच्या २५व्या स्मृतिदिनी सर्व जुने पँथर एकत्र आले आहेत. आपले आता पक्ष वेगवेगळे असले तरी समाज म्हणून आपण नेहमी एकत्र असले पाहिजे, अशी सामाजिक ऐक्याची साद आठवले यांनी यावेळी घातली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला सर्व दलित पँथर चळवळीतील ज्येष्ठ नेते पँथर ज. वि. पवार, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, गौतम सोनवणे, खासदार चंद्रकांत हंडोरेसह अन्य नेते उपस्थित होते. शहीद भाई संगारे यांच्या पत्नी सुषमाताई संगारे यांच्यासह कुटुंब उपस्थित होते.

आठवणींना उजाळा
ज्येष्ठ पँथर नेते तानसेन ननावरे यांनी दिवंगत शहीद भाई संगारे यांचे क्रांतिभूमी महाड येथे स्मारक करावे, अशी मागणी केली. यावेळी सर्वच वक्त्यांनी या मागणीला पाठिंबा दिला. दलित पँथर आणि त्यानंतर भारतीय दलित पँथरच्या चळवळीतील अनेक आठवणींना उजाळा देत शहीद भाई संगारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी सभागृह दलित पँथर चळवळीच्या आठवणींनी पँथरमय झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मदर ऑफ ऑल डील! भारत - EUमध्ये मुक्त व्यापार करारावर सह्या; PM मोदींनी केली घोषणा

Viral Video : पठ्ठ्याचा अनोखा विक्रम ! ३ मिनिटांत खाल्ले ४ किलो दही, लोक बघतच राहिले, व्हिडिओ व्हायरल

Don Bradman’s Cap : डॉन ब्रॅडमन यांनी भारतीय खेळाडूला गिफ्ट केलेल्या टोपीचा लिलाव; तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची लागली बोली...

Viral Maggi Video: डिग्रीपेक्षा कढई भारी? डोंगरात मॅगी विकून लाखोंची कमाई; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : भारत-युरोपियन संघाच्या मुक्त व्यापार करारावर सह्या : PM मोदी

SCROLL FOR NEXT