मुंबई

Crime: सोसायटीच्या अध्यक्षपदावरुन काढल्याचा आला राग; दाम्पत्यावर केला जीवघेणा हल्ला

या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी हा जीवघेणा हल्ला करणाऱ्या शरद खारकर यांच्यासह कुटुंबातील ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यापैकी दोघा भावांना अटक केली आहे.

CD

Navi Mumbai Crime: सोसायटीच्या अध्यक्षपदावरुन काढल्याचा राग मनात धरुन एकाने कुटुंबीयांसह सोसायटीतील एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी उलवे सेक्टर-२१ मधील अरॅमस कॉम्प्लेक्समध्ये घडली.

या हल्ल्यात हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी हा जीवघेणा हल्ला करणाऱ्या शरद खारकर यांच्यासह कुटुंबातील ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यापैकी दोघा भावांना अटक केली आहे.

खारकर कुटुंबीय व जखमी सिंग दाम्पत्य हे उलवे सेक्टर-२१ मधील अरॅमस कॉम्फ्लेक्समध्ये राहण्यास आहेत. या सोसायटीच्या अध्यक्षपदावर शरद खारकर हे होते. मात्र सोसायटीतील इतर सदस्यांनी केलेल्या तक्रारीनंतर उपनिबंधक कार्यालयाने शरद खारकर यांना अध्यक्षपदावरुन हटवून त्याजागी प्रशासकाची नेमणूक केली.

अविनाश सिंग यांच्यामुळेच खारकर यांना अध्यक्षपदावरुन हटवून प्रशासकाची नेमणूक करण्यात आल्याचा संशय खारकर कुटुंबीयांना होता. मंगळवारी सकाळी या कॉम्फ्लेक्समधील डि विंगची लिफ्ट बंद पडली. याला अविनाश सिंग हेच जबाबदार असल्याचा आरोप करत खारकर कुटुंबीयांनी अविनाश सिंग व त्याची पत्नी नेहा या दोघांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.

यावेळी विजय खारकर याने स्टीलच्या रॉडने अविनाश सिंग यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा डावा हातही फ्रॅक्चर झाला. यावेळी शरद याच्या मुलाने नेहा सिंग हिला मारहाण केल्‍याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर सोसायटीतील इतर सदस्यांनी या दोघा जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

एनआरआय पोलिसांकडून कारवाई
अरॅमस कॉम्फ्लेक्समधील या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनआरआय पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमींचे जबाब नोंदवून घेतले. त्यानंतर त्यांना मारहाण करणारे शरद खारकर, विजय खारकर यांच्यासह त्यांच्या कुटूंबांतील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून शरद व विजय खारकर या दोघा भावांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT