मुंबई

Navi Mumbai Accident News: खारघरमध्ये कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; जाणून घ्या घटनाक्रम

Mumbai News: अपघातानंतर खारघर पोलिसांनी रिझवानला धडक देणाऱ्या कारचालक अरुण घाटविसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

Navi Mumbai News: खारघर येथून सीबीडी बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री खारघरमधील बेलपाडा मेट्रो स्थानकाजवळ घडली.

खारघर पोलिसांनी या अपघाताप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

या अपघातात मृत झालेला रिझवान साबीरअली शाह (३०) हा खारघर, सेक्टर-३५ एफमध्ये राहण्यास होता. तसेच तो व त्याचे भाऊ कॅटरर्सचा व्यवसाय करत होते. मंगळवारी दुपारी रिझवान कळंबोली येथील त्याच्या ओळखीतील मौलाना यांच्याकडे गेला होता.

तेथून तो रात्री खारघर येथील घरी परतण्यासाठी बेलपाडा मेट्रो स्थानकासमोरील रस्त्याने पायी चालत जात होता. या वेळी बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने रिझवानला धडक दिली.

या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या अपघातानंतर खारघर पोलिसांनी रिझवानला धडक देणाऱ्या कारचालक अरुण घाटविसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी नवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT