मुंबई

Navi Mumbai Crime: पोलिसांनी केली मोठी कारवाई; तब्बल १० लाखांचा एमडी जप्त

१० लाख १० हजार रुपये किमतीचा १०१ ग्रॅम वजनाचा एम. डी. (मेफेड्रॉन) जप्त केला आहे |MD D. (Mephedrone) weighing 101 grams worth 10 lakhs 10 thousand rupees. has been seized

CD

Navi Mumbai: उलवे येथील वहाळ गावाजवळ अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका नायजेरीयन नागरिकाला अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा लावून अटक केली.

ओईनकेवुकेवु ईलजिआह आयफिनयी (३०) असे अटक केलेल्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला १० लाख १० हजार रुपये किमतीचा १०१ ग्रॅम वजनाचा एम. डी. (मेफेड्रॉन) जप्त केला आहे.

उलवेमधील वहाळ गावालगत शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास एक नायजेरीयन अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती.

त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज चौधरी व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री वहाळ गावाकडून किल्ला जंक्शनकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर सापळा लावला होता. रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ओईनकेवुकेवु हा दुचाकीवरून आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याजवळ १० लाख १० हजार रुपये किमतीचा १०१ ग्रॅम वजनाचा एम. डी. (मेफेड्रॉन) आढळून आला. त्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने एनआरआय पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT