मुंबई

ठाणे पान दोन पट्टा

CD

तीन दिवस ठाण्यात प्रदर्शन
ठाणे (बातमीदार) : प्राच्यविद्या अभ्यास संस्था (ठाणे) आणि वात्सल्य फाऊंडेशन (वडोदरा) यांच्या सहकार्याने हाताने रंगविलेल्या रामायणातील ३५ चित्रकथा दाखवणारे एक अनोखे प्रदर्शन प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शुक्रवारपासून (ता. २६) सुरू होणार असून तीन दिवस चालणार आहे. प्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ. विजय बेडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत आहे.
...............
ब्रीम्सचा सामंजस्य करार
ठाणे (बातमीदार) : डॉ. व्ही. एन. बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ब्रीम्स) व्यवस्थापन संस्था यांनी व्यवस्थापन शिक्षणातील अग्रगण्य संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसोबत २२ एप्रिलला सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या नेतृत्वाखाली, आयआयएम, मुंबईचे असोसिएट डीन (अकॅडेमिक्स) प्रा. सुमी झा आणि डीआर व्हीएन डॉ. नितीन जोशी यांच्या उपस्थितीत आयआयएमचे डीन प्रा. शंकर मूर्ती यांच्या कार्यालयात स्वाक्षरी समारंभ पार पडला.
..................
घाणेकर नाट्यगृहात ऑटिझमविषयी जागरूकता
ठाणे (बातमीदार) : दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या गुणांना वाव मिळावा, यासाठी राजहंस संस्थेतर्फे ऑटिझमविषयी वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गायन, वादन आणि नृत्यांनी परिपूर्ण असा कार्यक्रम मंगळवारी (ता. २३) काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये पार पडला. छोट्या मुलांनी रामायण सादर केले, तसेच कीबोर्डवर सुंदर गाणी वाजवली. १६ विशेष मुलांच्या मातांनी मराठी गाण्यावर सादर केलेले नृत्य हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. अंजूर येथे होणाऱ्या प्रकल्पाची नृत्यातून माहिती देण्यात आली. राजहंस फाऊंडेशन ही संस्था मागील दहा वर्षांपासून ठाण्यात ऑटिझमविषयी जागरूकता करण्याचे काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून मुलांसाठी आतापर्यंत ७०च्या वर अनेक वेगवेगळ्या कार्यशाळा, पालकांसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, ऑटिझमबद्दल आमादा कार्यक्रम, फनफेअर, प्रदर्शने भरवणे असे बरेच कार्य फाऊंडेशनने केले आहे. २०१६ मध्ये संस्थेचे व्‍होकेशनल सेंटर सुरू झाले. ज्यात हस्तव्यवसायाच्या अनेक वस्तू जसे तोरणे, कंठी, एलईडी हँगिंग्स वगैरे तयार होतात. चॉकलेट, वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी तयार होते. कॉम्प्युटर ट्रेनिंग, डेटा एन्ट्रीची कामे करणे असे अनेक उपक्रम केले जातात. ज्याचा उद्देश मुलांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा आहे. या बरोबरीनेच संगीत, नृत्य याचेही शिक्षण दिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT