mira rode crime sakal
मुंबई

Mumbai Crime : मिरा रोड येथे तरुणीवर लैंगिक अत्याचार; वाचा नक्की काय घडलं!

CD

Mumbai Crime News: मिरा रोड येथे राहणाऱ्या सव्वीस वर्षीय तरुणीला बेशुद्ध करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे

. त्यानंतर आरोपीने तरुणीचे अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिचे डोक्यावरचे केस कापल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नयानगर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिरा रोड येथे राहणाऱ्या तरुणीची गेल्यावर्षी कल्याण येथे राहणाऱ्या मोहसीन शेख याच्याशी ओळख झाली. त्यानंतर मोहसीन याने तिच्याशी ओळख वाढवून तिच्यावर प्रेम जडले असल्याचे सांगितले. मात्र, तरुणीने त्याला नकार देऊन केवळ मैत्री ठेवण्याबाबतच त्याला सांगितले. त्यानंतर एके दिवशी तरुणीचे आई-वडील घरात नसताना मोहसीन तिच्या घरी जात तिला गुंगीचे औषध मिसळलेली बिर्याणी खायला दिली.

त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याने या घटनेची छायाचित्रेही काढली. त्याच्या आधारे मोहसीन या तरुणीला ब्लॅकमेल करून तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडू लागला. शिवाय तिच्याकडून आरोपीने पैसेही उकळले. त्यानंतर आरोपीने तिला मुस्लीम धर्म स्वीकारल्यास तिच्याशी लग्नही करण्याचे प्रलोभन दिले.

मात्र, यावेळी तरुणीने धर्म बदलण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने तिच्या डोक्यावरचे केस कापून टाकले. यावेळी मोहसीन याचे भाऊ, काका व अन्य नातेवाइकांनी पीडितेला लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. अखेर तरुणीने शुक्रवारी (ता. २६) नयानगर पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी मोहसीन शेख याच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यापैकी मुख्य आरोपी मोहसीन शेख याला अटक करण्यात आल्याची माहिती नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT